करमाळ्यातील ‘जामा मज्जीद’ येथे आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील यांच्या उपस्थितीत “इफ्तार पार्टी” संपन्न..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा शहरातील वेताळपेठ येथील जामा मशीद मध्ये डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आझाद फाउंडेशन व जामा मशीद ट्रस्ट तसेच मुस्लिम समाजाच्यावतीने सदर इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते, सदर इफ्तार पार्टीमध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून विधान परिषदेचे भाजपाचे आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील तसेच माजी आमदार नारायण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ एपीजे अब्दुल कलाम आझाद फाउंडेशन तसेच जामा मशीद ट्रस्टचे पदाधिकारी यांनी सदर इफ्तार पार्टी चे नियोजन केले होते, यावेळी माजी आमदार नारायणआबा पाटील, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, मुस्लीम समाजातील विचारवंत कलीम काझी, आझाद शेख, अमरजीत साळुंखे जगदीश अग्रवाल रितेश कटारिया नरेंद्रसिंह ठाकुर, सुहास ओहोळ, अंगद देवकते, किसन कांबळे, आबासाहेब टापरे, डॉ अमोल घाडगे, सुदर्शन तळेकर, ज्ञानेश पवार तसेच नितीन आढाव, बंडू माने, कपिल मंडलिक आदी मान्यवर यावेळी इफ्तार पार्टीला उपस्थित होते.
यावेळी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम फाउंडेशन ने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मोहल्ला गल्ली , माळी गल्ली, दगडी रोड, किल्ला विभाग रोड कडे जाणारा रस्ताच्या दिशेने सी सी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत तसेच माॅं आयशा मस्जिद मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत त्यांचे उद्घाटन रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी संस्थेचे चे संस्थापक अध्यक्ष समीर शेख, सचिव पिंटु शेठ बेग, जामा मस्जिद चे विश्वस्त अध्यक्ष जमीर भाई सय्यद, अर्बन बँकेचे माजी संचालक फारुख भाई जमादार, उपाध्यक्ष जहाँगीर बेग,फिरोज बेग, इमत्याज पठाण, इंदाज वस्ताद,जिलाणी पठाण , दिशान कबीर, माजित शेख, अरबआज बेग, अकिल शेख, सलीम शेख,इस्त्रायल शेख, आदी उपस्थित होते.