जेऊर येथे संभाजी ब्रिगेड मार्फत इफ्तार पार्टीचे आयोजन

केम (प्रतिनिधी/संजय जाधव) – करमाळा तालुक्यातील जेऊर येथे संभाजी ब्रिगेड तर्फे रमजान पवित्र महिण्यानिमित्त आलिफ मस्जिद व इंदिरानगर मस्जिद येथे इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, तालुका उपप्रमुख दादासाहेब थोरात बाळासाहेब झोळ बालाजी गावडे निलेश पाटील सुहास पोळ अतुल निर्मळ पांडुरंग घाडगे पिंटू जाधव आदिनाथ माने अजित उपाध्ये महेश कांडेकर अविनाश घाडगे हेमंत शिंदे किशोर कदम जयकांत गावडे विजयकांत गावडे यावेळी दोन्हीही मस्जिद मध्ये बहुसंख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते
संभाजी ब्रिगेड हि संघटना जाती जातीत तेढ निर्माण न करता सर्व जातीतील लोकांना एकत्रित घेऊन काम करणारी संघटना आहे. हिंदू-मुस्लिम बांधवांमध्ये सामाजिक सलोखा राहावा यासाठी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
– नितीन खटके, पुणे विभागीय अध्यक्ष,संभाजी ब्रिगेड


