स्कुल चले हम! वडगाव मध्ये शाळेने काढली विद्यार्थ्यांची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील उत्तर वडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन विद्यार्थ्यांचा प्रवेश उत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पहिलीत दाखल पात्र विद्यार्थ्यांची बैलगाडीतून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.

संपूर्ण शाळेला फुग्यांचे आकर्षक असे डेकोरेशन करण्यात आले पहिलीत दाखल मुलांचे औक्षण करून त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले त्या नंतर शाळेतील विध्यार्थी यांनी पहिल्याच दिवशी पुस्तके वाटप करण्यात आली तसेच या शाळेत 1 ते 7 वी पर्यंत शिक्षण घेतलेल्या व दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करण्याऱ्या गुणवंत विध्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला शेवटी मुलांना गोड जेवण देण्यात आले.

या कार्यक्रमासाठी या बीट चे विस्तार अधिकारी श्री टकले व जातेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री गटकळ शाळा व्यवस्थापन अध्यक्ष संजय रोडगे, उपाध्यक्ष मोसीन शेख तसेच बालाजी अंधारे प्रशांत भांडवलकर राहुल शिंदे अनपट मयूर जोशी आदी ग्रामस्थ व महिला उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री नवनाथ ससाणे श्री मधुकर शिंदे श्री सुनिल नरसाळे श्री होनकळसे श्रीमती सुलभा खुळे व अंगणवाडी सेविका यांनी परिश्रम घेतले



