करमाळा शहरात 'जैन साधू हत्या' प्रकरणाचा सकल जैन समाजाचा रेबीन बांधून मूक मोर्चा... -

करमाळा शहरात ‘जैन साधू हत्या’ प्रकरणाचा सकल जैन समाजाचा रेबीन बांधून मूक मोर्चा…

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी

करमाळा : कर्नाटकात झालेल्या जैन साधू हत्याप्रकरणाचा निषेध म्हणून करमाळा शहरात सकल जैन समाज बांधवाच्यावतीने आज (ता.२०) दंडाला काळे रेबीन बांधून मूक मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी या मुक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने जैन सामाजाचे बांधव सहभागी झाले होते.

या मोर्चामध्ये जैन समाज बांधवांसोबत महिलांची संख्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. महसूलचे नायब तहसीलदार शैलेश निकम यांनी मोर्चेकरांचे निवेदन स्विकारले. यावेळी समीर पटेल उपस्थित होते.

हा मोर्चा करमाळा शहरातील जैन मंदिर येथून निघून करमाळा तहसील कार्यालय येथे मोर्चा सांगता करण्यात आली, याप्रसंगी याठिकाणी डॉ.सुनिता दोशी यांनी घटनेचा निषेध करत मनोगत व्यक्त केले. या मोर्चाला आरपीआयचे लक्ष्मण भोसले यांनी पाठिंबा दिला. याप्रसंगी पोलिस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक एम.एन.जगदाळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कुंजीर यांनी बंदोबस्त ठेवला. याप्रसंगी करमाळा शहरातील अनेक जैन बांधव उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!