शिष्यवृत्ती परीक्षेत वांगी नं. २ शाळेतील ३ विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत -

शिष्यवृत्ती परीक्षेत वांगी नं. २ शाळेतील ३ विद्यार्थी जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत

0

केम (संजय जाधव):करमाळा तालुक्यातील वांगी नं. २ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने शैक्षणिक गुणवत्तेचा नवा उच्चांक गाठला आहे. शाळेतील विद्यार्थी आरोही पाटील (२६० गुण), शौर्यतेज मुळे (२५८ गुण) व समीक्षा सपकळ (२४४ गुण) यांनी इयत्ता ५ वीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सोलापूर जिल्ह्यातील गुणवत्ता यादीत आपले नाव उमटवले आहे.

या परीक्षेसाठी शाळेतील एकूण १५ विद्यार्थी सहभागी झाले होते, त्यापैकी सात विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती मिळवली आहे.

या यशामागे वर्गशिक्षक सुरेश राऊत यांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ लाभले आहे. त्यांच्या यशाचे गटशिक्षणाधिकारी जयवंत नलवडे, विस्तार अधिकारी नितीन कदम, चिखलठाण केंद्राच्या प्रमुख वंदना पांडव, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले आहे.

ही कामगिरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता आणि प्रयत्नांचे फलित दाखवून देणारी ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!