उत्तरेश्र्वर विद्यालयात ग्रंथपाल भाकरे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न -

उत्तरेश्र्वर विद्यालयात ग्रंथपाल भाकरे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न

0

केम (संजय जाधव):केम येथील श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील ग्रंथपाल श्री तुकाराम नारायण भाकरे  यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सुरुवातीला शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन करण्यात आले.


       या सत्कार समारंभ सोहळ्याला प्रमुख उपस्थिती सोलापूर जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य सौ कल्याणीताई अजितदादा तळेकर, उपसरपंच सागर कुर्डे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री सचिन रणशृंगारे, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर, ज्येष्ठ  राहुल रामदासी,श्री उत्तरेश्वर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री  सातव सर, कुर्मदास विद्यामंदिर लऊळचे माजी मुख्याध्यापक श्री बी.एस तळेकर सर राजाभाऊ तळेकर विद्यालयाचे  मुख्याध्यापक श्री मनोज तळेकर सर,शिवाजी प्राथमिक विद्यामंदिर केमचे मुख्याध्यापक श्री नागनाथ तळेकर सर, शारदाताई गोविंदराव पवार संस्थेचे अध्यक्ष श्री गोरखकाका पारखे साहेब नेताजी सुभाष विद्यालय केतूरचे पर्यवेक्षक श्री.बुरूटे सर, श्री किशोर जाधवर सर, सेवक महानवर सर, ग्रंथपाल श्री माधव कुंभार, सौ स्नेहा तळेकर,सौ भिस्ते,श्री उत्तरेश्वर हायस्कूलचे माजी शिक्षक डी.एन तळेकर सर , श्री कोंडलकर सर,प्रा.अमोल तळेकर सर , श्री विकास कळसाईत  तसेच शालेय व्यवस्थापन समितीतील सर्व सदस्य, केम गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


       यावेळी मुख्याध्यापक एम.डी बेले सर आणि पर्यवेक्षिका सौ नरखेडकर मॅडम यांच्या हस्ते प्रशालेतर्फे  ग्रंथपाल श्री तुकाराम भाकरे सर आणि सौ.गीता भाकरे यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव सत्कार करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषद नवनिर्वाचित सदस्य सौ कल्याणीताई अजितदादा तळेकर यांच्या हस्ते श्री तुकाराम भाकरे सर आणि सौ.गीता भाकरे यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव सत्कार करण्यात आला. तसेच उपसरपंच श्री सागर कुर्डे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री सचिन रणशृंगारे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष श्री गणेश तळेकर यांच्या  श्री तुकाराम भाकरे सर आणि सौ.गीता भाकरे यांचा सेवापूर्ती गौरव सत्कार करण्यात आला.

यावेळी शिक्षक मनोगता मध्ये प्रा. डॉ.मच्छिंद्र नागरे  यांनी ग्रंथपाल श्री तुकाराम भाकरे सर  यांच्या श्री उत्तरेश्वर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील आठवणी सांगून,  महावाचन स्पर्धा, ग्रंथालय चळवळीमधील  त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक करून सेवानिवृत्ती नंतर पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.  माजी मुख्याध्यापक श्री सातव सर यांनी ग्रंथपाल भाकरे सरांचे कार्य उल्लेखनीय आहे असा सेवा गुणगौरव केला. प्रशालेचे मुख्याध्यापक एम.डी बेले सर यांनी ग्रंथपाल श्री भाकरे सर यांनी प्रामाणिकपणे सेवा बजावली. त्यांना सेवानिवृत्तीनंतर पुढील आयुष्य आरोग्यदायी जावो अशा शुभेच्छा दिल्या.  ग्रंथपाल श्री भाकरे सर यांची कन्या धनश्री भाकरे हिने आपल्या वडिलांचे कार्य कवितेच्या माध्यमातून व्यक्त करून सर्वांना भावूक केले. सत्कारमूर्ती ग्रंथपाल श्री तुकाराम भाकरे सर यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर या संस्थेतील सेवा अनुभव माझ्यासाठी प्रेरणादायी होता तसेच शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे हेच आमचे दैवत आहे असे मनोगत व्यक्त केले.


      यावेळी शैक्षणिक वर्ष 2024 -25 मधील इयत्ता दहावी मधील गुणवंत विद्यार्थी प्रथम क्रमांक कुमारी तळेकर वैभवी दयानंद, द्वितीय क्रमांक कुमारी प्रतिक्षा विकास कळसाईत,
तृतीय क्रमांक कुमारी प्रज्ञा सुदर्शन भिस्ते यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेज मधील 2024-2025 मधील इयत्ता बारावी परीक्षेत प्रथम  क्रमांक कुमारी पठाण सानिया खदुबुद्दीन, द्वितीय क्रमांक कुमारी जगताप राजनंदनी बाळकृष्ण, तृतीय क्रमांक कुमारी कांबळे विद्या या विद्यार्थिनींचा सत्कार व पारितोषिक वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी विद्यार्थी मनोगत कुमारी सृष्टी बोराटे या विद्यार्थिनीने व्यक्त केले.या समारंभाचे सूत्रसंचालन के एन वाघमारे यांनी केले. तर आभार एम.एम पोतदार यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!