निंभोरे येथे माझी लाडकी बहीण योजनेचा लोकार्पण सोहळा व कृषी संजीवनी कार्यक्रम संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – आज (दि.२ जुलै) करमाळा तालुक्यातील निंभोरे येथे कृषी दिनानिमित्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लोकार्पण सोहळा व कृषी संजीवनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. निंभोरे येथील यश मंगल कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमाची सुरुवात दिपज्वलनाने करण्यात आली व सांगता वृक्षारोपणाने करण्यात आली.यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत शेतकरी बांधवांच्या व्यथा मांडल्या. श्री छत्रपती संभाजी विद्यालयातील सारथी शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी श्रद्धा रामा वाघमारे, मधुरा रामभाऊ वळेकर, शिवराज अर्जुन कन्हेरे यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते हार,शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
सदर कार्यक्रमात उमेद तालुका अभियान व्यवस्थापक योगेश जगताप यांनी बचत गटांना मार्गदर्शन केले.
तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे यांनी कृषी विषयी योजना समजावून सांगत लाभ घेण्याचे आव्हान केले. तसेच जेऊर मंडळाच्या कृषि पर्यवेक्षक रोहिणी सरडे यांनी उपस्थितांना PMFME योजने विषयी माहिती दिली. गटविकास अधिकारी मनोज राऊत यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेविषयी संपूर्ण माहिती दिली. तसेच अंगणवाडी सेविका, बचत गट, आशा सेविका यांना योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले.
अध्यक्षीय भाषणात निंभोरे गावचे लोकनियुक्त सरपंच रविंद्र वळेकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याचे आव्हान केले.या योजनेतील त्रुटी व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. तसेच जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा व काही अडचणी असल्यास तातडीने संपर्क साधा. आम्ही सर्वोतोपरी मदत करू असे सांगितले. 15 जुलै पर्यंत अर्ज भरा. उशीर केल्यास योजनेपासून वंचित राहावे लागेल. त्यामुळे तातडीने कागदपत्रे काढून घेत अर्ज दाखल करावे असे आव्हान केले.
तसेच ग्रामीण कृषी कार्यानुभव आणि कृषी उद्योजकता अभ्यास करण्यासाठी निंभोरे गावात राहुरी कृषी विद्यापीठातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांची गावाशी व अधिकारी वर्गाशी ओळख करून देत त्यांना मदत करण्याचे आव्हान केले.
यावेळी उपसरपंच अनिता पाटील, उमेद अभियान चे तालुका व्यवस्थापक योगेश जगताप,मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड, कृषी पर्यवेक्षिका रोहिणी सरडे,कृषी पर्यवेक्षक प्रताप तळेकर,बि.के.बेरे,आकाश पवार, हनुमंत पवार,दोंड भाऊसाहेब, कांबळे भाऊसाहेब, जगदाळे साहेब ,मुख्याध्यापक श्री.व्यवहारे, सौ.कुलकर्णी,सर्व शिक्षक,आशा सेविका,CRP सुषमा वाघमारे,मंजुश्री मुळे, शीतल दळवे, ग्रा.पं. सदस्य दिपक गवळी, प्रवीण वळेकर, दत्ता वळेकर, समाधान गाडे,ग्रा.पं.सदस्य समाधान वळेकर, लक्ष्मण वळेकर,राज पठाण,मुन्ना पठाण आदी.ग्रामस्थ व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी गणेश शेठ सलगर,राणी लक्ष्मी महिला ग्रामसंघ व जिजाऊ महिला ग्रामसंघ, प्रशिक्षित विद्यार्थी, ग्रामपंचायत कर्मचारी, दिलीप मुळे, रविंद्र राऊत, संतोष पाटील,महेश वाघमारे,पप्पू मस्के,जलाल पठाण,बाबुराव भंडारे यांनी विशेष परिश्रम घेतले.