जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा कामाचा लोकार्पण सोहळा आमदार शिंदे यांच्या हस्ते संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा तालुक्यातील 104 गावांसाठी जल जीवन मिशन योजनेसाठी 94 कोटी 29 लाख 10 हजार 596 रुपये निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यापैकी आज (दि.६ जानेवारी) वांगी नं.१ येथे जल जीवन मिशन योजनेतंर्गत नळ पाणीपुरवठा करणे या पुर्ण कामाचा लोकार्पण सोहळा करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी जि.प.सदस्य,मा.निळकंठ आप्पा देशमुख,मा.तात्यामामा सरडे,मा.राजाभाऊ देशमुख, सरपंच प्रतिनिधी मा.संतोष देशमुख, उपसरपंच मा.अमोल दैन, ग्रामसेवक मा.सलीम तांबोळी, पाणीपुरवठा उपविभागीय अभियंता मा.अजित वाघमारे, शाखाधिकारी बाबासाहेब वाहेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
जलजीवन मिशन योजने मधून गावांना पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी विहीर खोदणे, मुख्य पाईपलाईन, टाकी बांधणे व गावासह प्रत्येक वाडी – वस्तीवरील घरांमध्ये नळ कनेक्शन देणे आदी कामे केली जातात.