करमाळ्यात कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न - विविध कृषी विषयक तसेच अत्याधुनिक यांत्रिकीकरण स्टॉल.. -

करमाळ्यात कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न – विविध कृषी विषयक तसेच अत्याधुनिक यांत्रिकीकरण स्टॉल..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी : 

करमाळा : राज्याचे माजी मंत्री स्व.दिगंबरराव बागल यांच्या 68 व्या जयंतीच्या निमित्ताने करमाळा येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या मैदानावर कृषी प्रदर्शनाचे आज (ता.९) सायंकाळी ५  वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला, याप्रसंगी  माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री दिलीप सोपल, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार शामलताई बागल, बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, मकाईचे चेअरमन दिग्विजय बागल, विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, बाजार समितीचे सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर, उपसभापती चिंतामणी जगताप, तात्यासाहेब मस्कर, सचिन घोलप, विजय लावंड, संतोष देशमुख धनंजय डोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कृषी प्रदर्शनाच्या मुख्य प्रवेशद्वाराचे फित कापून या महोत्सवाची सुरुवात झाली व पुढे स्व.दिगंबरराव बागल यांच्या तत्कालीन वापरातील लाल दिव्याच्या गाडीचे पुजन करण्यात आले. तसेच पुढे एका स्वतंत्र दालनात “आठवणीतील मामा” या दालनाचे उदघाटन झाले. या दालनात 820 फोटोतून मामांच्या आठवणीला उजळणा देण्यात आला आहे. याच दालनात दिगंबरराव बागल यांच्या प्रतिकृती असलेली रांगोळी काढली आहे. या कृषी प्रदर्शनात विविध कृषी विषयक माहिती असलेले दालन, विविध कंपन्याचे ट्रॅक्टर, खाद्यपदार्थ, विविध बचतगटाचे स्टॉल, इलेट्रिक मोटारसायकल, तसेच इलेट्रिक सायकल, सोलर पॅनल विविध कृषी यांत्रिकी विभाग असे विविध स्टॉल लावण्यात आले आहेत. 

सर्व फोटो पाहण्यासाठी खालील इन्स्टाग्राम पोस्ट मधील फोटो स्वाईप करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!