वांगी क्र. १ येथील सभा मंडपाचे आमदार शिंदे यांच्या हस्ते उद्घघाटन

केम (प्रतिनिधी/ संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील वांगी क्र. १ येथील झोटींगबाबा मंदीरासमोर बांधलेल्या सभामंडपाचे उद्घघाटन काल (दि.४) करमाळा -माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वांगी १ व परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या सभा मंडपाला आ.शिंदे यांनी आपल्या स्थानिक विकास निधी २०२२-२३ यामधून दिला होता.
यावेळी वांगी नं.१ गावचे नेते व माजी जि.प.सदस्य,निलकंठ आप्पा देशमुख,चिखलठाण गावचे सरपंच चंद्रकांतकाका सरडे, अर्जूनभाऊ रकटे, सुहासनाना रोकडे, माजी ता.पं.सदस्य,मा.रोहिदास सातव, अशोक तकीक, माजी जि.प.सदस्य,उध्दवदादा माळी, सोमनाथ रोकडे, राजाभाऊ देशमुख, तात्यामामा सरडे, मांगी गावचे चेअरमन सुजीततात्या बागल, व्हा.चेअरमन, अभिमान अवचर, सांगवी गावचे उपसरपंच वैभव तळे, वांगी नं.१ चे सरपंच संतोष देशमुख, उपसरपंच अमोल दैन, वांगी नं.३ चे सरपंच मयुर रोकडे, वांगी नं.४ चे सरपंच रामभाऊ सूळ, ग्रा.पं.सदस्य, धनंजय गायकवाड,अनिल केकान, तसेच सर्व ग्रा.पं.सदस्य, व ग्रामस्थ, तरुण मित्र उपस्थित होते.