करमाळ्यात 'भारत डाळ' योजनेचा खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्या शुभारंभ - Saptahik Sandesh

करमाळ्यात ‘भारत डाळ’ योजनेचा खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते उद्या शुभारंभ

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – ‘भारत डाळ’ योजनेचा उद्या १६ ऑक्टोबर रोजी करमाळा येथे खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते शुभारंभ होणार असेल अशी माहिती भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा करमाळा माढा विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश चिवटे यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळीनिमित्त ‘भारत डाळ’ योजनेतर्गत राज्यातील प्रत्येक व्यक्तीला ६०/- रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो हरभरा दाळ मिळणार आहे. सर्वसामान्यांना ही दाळ स्वस्त दरात मिळावी म्हणून नाफेडच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला आधार कार्डच्या ओळख पत्रावर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ, फक्त ६० रु प्रतिकिलो दराने उपलब्ध करून दिली जाणार आहे. दाळ खरेदीसाठी आधार कार्ड सक्तीचे असून एका कुटुंबात पाच सदस्य असतील तर प्रति व्यक्ती ५ किलो दाळ खरेदी करता येणार आहे.या योजनेचा शुभारंभ उद्या (दि.१६ ऑक्टोबर) माननीय खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे हस्ते भाजपा कार्यालय करमाळा येथे आयोजित करण्यात येणार आहे.करमाळा तालुका व परिसरातील नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचं आवाहन चिवटे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!