करमाळा येथील आय.टी.आय.कॉलेजमध्ये संविधान मंदिराचे लोकार्पण संपन्न…!

करमाळा / संदेश प्रतिनिधी : येथील शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेमधे “संविधान मंदिर लोकार्पण” सोहळा पार पडला असून, मंचाचे लोकार्पण भारताचे उपराष्ट्रपती श्री जगदीप धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या ४३४ शा.औ.प्र.संस्थामध्ये पार पडला. यावेळी ग्रामसुधार समिती अध्यक्ष ॲड.डॉ.बाबुराव हिरडे व यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा.गणेश करे पाटील हे उपस्थित होते.

यावेळी संविधानाचे महत्त्व प्रशिक्षणार्थ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न मान्यवर व त्यांच्याद्वारे करण्यात आला. संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करण्याची भारताच्या सार्वभौम लोकशाहीसाठी अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन ॲड.हिरडे यांनी केले, तर भारताचे सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, संविधान लिहिण्याची गरज व त्यातील प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी असणारी सुरक्षितता, बंधुता यांची चर्चा गणेश करे-पाटील यांनी केली. यावेळी बुद्धाचार्य प्रशांत कांबळे, लक्ष्मण भोसले यांनीही प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रथम ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते संस्थेमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य राजेंद्र आवडे यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कट्टीमनी सर यांनी केले. तर श्री माने सर यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यास श्री परदेशी सर, श्री साठे सर, श्री मनेरी सर, सौ. सूर्यपुजारी मॅडम, श्री उंटवाल सर, श्री शिरसट सर, श्री भोयर सर, श्री गुरव सर, श्री शिंदे सर , इतर कर्मचारी श्री महाडिक व श्री शेख या सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.







