यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विभागीय योगासन स्पर्धांचे उद्घाटन
करमाळा (दि.८) – यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व सोलापूर योग परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यामाने विभाग स्तरीय योगासन क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या पाठीमागील सभागृहात संपन्न झाले.
शालेय विभागीय योगासन स्पर्धा वयोगट 14 ,17 व 19 वर्ष मुले व मुली सहभागी झालेले आहेत. सोलापूर जिल्हा व सोलापूर महानगरपालिका, अहमदनगर जिल्हा व अहमदनगर महानगरपालिका, पुणे जिल्हा व पुणे महानगरपालिका, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका या सात ठिकाणावरून 294 विद्यार्थी या विभागीय स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये 147 मुले व 147 मुली यांनी आपला सहभाग नोंदवलेला आहे. या विभागीय स्पर्धेचा कालावधी 08 व 09 ऑक्टोबर असा आहे. पुणे,सोलापूर,अहमदनगर जिल्ह्यातून आलेले सर्व खेळाडू, प्रशिक्षक , पंच, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी मोख्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड, संस्थेचे सहसचिव विक्रमसिंह सूर्यवंशी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. बी.पाटील,कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य श्री.संभाजी किर्दाक, तालुका क्रीडा अधिकारी प्रा.राम काळे,श्री.तानाजी मोरे, नरेंद्र पवार, श्रीमती पेडसे अध्यक्षा सोलापूर जिल्हा योग परिषद हे मान्यवर उपस्थित होते.