करमाळा येथे धर्मसंगीत लॉन्स मंगल कार्यालयाचे १९ ऑगस्टला उद्घाटन

करमाळा (संदेश प्रतिनिधी) – येथील कर्जत रोडवर नव्याने निर्माण झालेल्या धर्मसंगीत लॉन्स मंगल कार्यालयाचा उद्घाटन सोहळा १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार आहे. या कार्यालयाचे उद्घाटन आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते होणार आहे. यावेळी ह.भ.प.माऊली महाराज पठाडे यांचे किर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक आबासाहेब आवटे यांनी केले आहे.
करमाळा शहरापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर हे भव्य असे मंगल कार्यालय श्री.आवटे यांनी उभा केले असून, या ठिकाणी एक हजार खुर्च्या, शंभर टेबल तसेच सहा रूम वधू-वरासाठी, स्वयंपाक व जेवणाची भांड, ३५ केव्ही जनरेटर, साऊंड सिस्टीम तसेच वायफाय सुविधा, सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेराची निगराणी राहणार आहे. तसेच कार्यालयाच्या लॉन्स एन्ट्रीला भव्य असे रोमन थीम डेकोरेशन सेट संपूर्ण लाईटींगसह उभारलेला आहे. या ठिकाणी सर्व सुविधायुक्त प्रशस्त लॉन्स, लग्न हॉल, जेवण हॉल, किचन, प्रशस्त पार्कंग असे अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी पॅकेजची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. करमाळा शहरापासून अत्यंत जवळ असलेले भव्य असे हे देखणे व लॉन्स मंगल कार्यालय आहे. याचा जास्तीत जास्त नागरीकांनी लाभ घेण्याचे आवाहन आवटे यांनी केले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून माजी विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. शहाजी सोळुंके, आमदार रोहित पवार, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार नारायण पाटील, माजी आमदार शामलताई बागल, जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नवनाथ घोगरे, पोलीस निरीक्षक ज्योतिराम गुंजवटे, उद्योजक भरत लिमन आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. उद्घाटनानंतर माऊली महाराज पठाडे यांचे किर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. या सेवेचाही लाभ नागरीकांनी घेण्याचे आवाहन आवटे यांनी केले आहे.



