घोटी महिला गृह उद्योगाच्या करमाळा कार्यालयाचे अॅड.हिरडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – घोटी महिला गृहउद्योग समूह, संचलित आम्ही सुगरणी महिला उद्योग यांचे करमाळा येथे संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल (दि. ५ जानेवारी) रोजी जेष्ठ पत्रकार ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार जयंत दळवी, पत्रकार अनिल तेली, श्रीदेवीचामाळ येथील नवनियुक्त सरपंच सिध्देश्वर सोरटे दिलीप भूजबळ, शेखर पवार आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.
घोटी (ता. करमाळा) येथे नुकताच महिला गृह उद्योग सुरू झालेला असून या उद्योगाद्वारे विविध उत्पादने तयार केली जात आहेत. यामध्ये मसाला उद्योग, बेकरी उत्पादने, नमकीन स्नॅक्स, पाऊच, शेवई, नूडल्स, लोणचे पापड, कुरडई, सांडगे, साल पापड्या तसेच हॉटेल, ढाबा, किराणा यासाठी लागणारे 200 पेक्षा जास्त उत्पादने तयार केले जात आहेत. या बरोबरच ‘आम्ही सुगरणी’ या ब्रँड नावाखाली विविध स्नॅक्स सेंटर,खाद्य पदार्थांच्या स्टॉलच्या फ्रॅंचाईज दिल्या जात आहेत. या उद्योगाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन किल्ला खंदक रोड, करमाळा येथे सुरू करण्यात आले असून त्याचे उद्घाटन काल दि. पाच जानेवारी रोजी ॲड.डॉ.बाबूराव हिरडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या उद्घाटनप्रसंगी घोटी महिला गृहउद्योग समूहाचे प्रमुख संतोष कुंभार, आशा कुंभार यांच्या हस्ते डॉ बाबूराव हिरडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अॅड. हिरडे यांनी
आपल्या भाषणात घोटी सारख्या ग्रामीण भागातुन मोठ्या धाडसाने सुरू केलेल्या विशेषतः महिलांना घेऊन सुरू केलेल्या उद्योगाचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी घोटी महिला गृहउद्योग समूहाच्या परिवाराच्या सुरेखा गुरव,विद्या शहा, लक्ष्मी थोरात, धनश्री थोरात या महिला सदस्यांसह सूर्या कुंभार, चंद्रकांत कदम, संतोष थोरात, समाधान दणाने, आनंद कांबळे इत्यादी मंडळी उपस्थित होती.