कर्मयोगी गोविंद बापू बालोद्यानचे उदघाटन संपन्न
करमाळा (दि.१७) – दिनांक १४ सप्टेंबर रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कर्मयोगी गोविंद बापू बालोद्यान भारत माँटेसरी व भारत प्रायमरी स्कूलच्या बाल गोपाळाना खुले करण्यात आले. या बालोद्यानामुळे संस्थेतील लहान मुलांना खेळण्यासाठी उत्तम बगीच्या,इतर खेळाची साधने उपलब्ध झाली आहेत अशी प्रतिक्रिया माजी आमदार व भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नारायण पाटील यांनी व्यक्त केले.
या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष राजूशेठ गादिया, संस्थेचे सचिव अर्जुन सरक संस्थेचे सदस्य संजयकुमार दोशी,श्री. पात्रुडकर,संदीप कोठारी, उपसरपंच नागेश झांजुर्णे संस्था सदस्य श्री सुनील बादल श्री शेरखान पठाण तसेच भारत प्रायमरी चे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे, भारत हायस्कूलचे प्राचार्य सरवदे भारत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अनंत शिंगाडे, श्री.शिंदे बी.एस,प्रा.श्री रविकिरण वाघमोडे क्रीडा शिक्षक श्री बाळासाहेब सरक याचबरोबर संस्थेतील सर्व विभागातील शिक्षक यावेळी उपस्थित होते.