आळजापूर येथे नवीन पोस्ट ऑफिस शाखेचे उद्घाटन – खासदार मोहिते-पाटील यांची उपस्थिती..

करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा (गणेश ढवळे याजकडून) : करमाळा पोस्ट ऑफिसच्या अंतर्गत आळजापूर (ता.करमाळा) येथे ३ जानेवारी रोजी नवीन पोस्ट ऑफिस शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या उद्घाटन सोहळ्यास पंढरपूर डाक विभागाचे अधिक्षक श्री मुन्ना कुमार, सहाय्यक डाक अधिक्षक श्री पाटील, डाक निरीक्षक करमाळा श्री शेवाळे, श्री इमडे, श्री विष्णू कांदे, श्री सोमनाथ कोरके उपस्थित होते. तसेच आळजापूरचे सरपंच श्री अशोक रोडे, ग्रामसेवक निकत भाऊसाहेब, पोलीस पाटील श्री विश्वंभर रोडे, श्री कैलास रोडे, शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष श्री रविकांत घोडके, श्री दत्तात्रय टेबाळे, श्री दिपक रोडे, श्री वारे, श्री अमरजीत साळुंखे, ॲड प्रशांत बागल डॉ.अमोल घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आळजापूर व परिसरातील ग्रामस्थांना केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, या उद्देशाने या नवीन पोस्ट ऑफिसची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना टपाल, बचत योजना, विमा, बँकिंग व इतर शासकीय सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.

पोस्ट ऑफिसमधील कर्मचारीवर्गात गणेश ढवळे, शरद माने, अमोल क्षीरसागर, श्री.देशपांडे, जीवन जाधव, अमेय कदम, सुलोचना गोरे, वैष्णवी काळे यांचा समावेश होता. यावेळी आळजापूर येथील सर्व ग्रामस्थ तसेच महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या शेवटी पोलीस पाटील विश्वंभर रोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नवीन पोस्ट ऑफिसमुळे आळजापूर व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून, ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.


