संभाजी बिग्रेड जनसंपर्क कार्यालयाचे करमाळ्यात उदघाटन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ‘संभाजी बिग्रेड’ च्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन १८ फेब्रुवारीला करमाळा शहरातील गणेशनगर येथे ‘संभाजी बिग्रेड’चे राज्य प्रवक्ते शिवश्री गंगाधर बनबरे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले. याप्रसंगी संभाजी बिग्रेडचे करमाळा शहराध्यक्ष शिवश्री वैभवराजे माने हे उपस्थित होते.
या उदघाटनप्रसंगी बोलताना शिवश्री गंगाधर बनबरे म्हणाले की, आज समाजात महापुरुष आणि संतांच्या विचारांचा वारसा रुजविण्याची अत्यंत गरज आहे..वैभव माने यांच्या सारख्या नव तरुणांनी हा विचार जनमनात रुजविण्याचे काम हाती घेतले आहे हे खूप मोलाचे आहे. तरुण पिढीचे हे नैतिक कर्तव्य आहे आणि ते समाजाला मार्गदर्शक ठरू शकते.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संभाजी बिग्रेड सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन बापू जगताप हे होते, याप्रसंगी मराठा सेवा संघाचे माजी अध्यक्ष शिवश्री प्रा.नागेश माने, सचिन जगताप, गणेश सव्वाशे जि.संघटक,जि उपाध्यक्ष शंकर पोळ, मराठा सेवा संघ ता.अध्यक्ष अतुल वारे,ता.अध्यक्ष अमित घोगरे,ता करमाळा शहराध्यक्ष वैभव माने ,संघटक गणेश डोके ,या. कार्याध्यक्ष राजेश ननावरे, ता संघटक मयुर सावंत दत्ता करणे, चंदु माने, वंदेमातरम संघटनेचे अध्यक्ष शिवश्री बाळासाहेब जगताप, बळीराजा संघटनेचे जिल्हाध्यक्ष आण्णा सुपनर, सामाजिक कार्येकर्ते सुनील गायकवाड आदीजण उपस्थित होते.
यावेळी सुनील भोसले, रहेनुमा चॅरिटेबल चे उपाध्यक्ष इम्तियाज पठाण,मुस्तकीम पठाण,आझाद शेख,जिशान कबीर,दिगंबर बापू साळुंखे, माजी अध्यक्ष, मराठा सेवा संघ, शिवाजी बनकर ,तालुका उपाध्यक्ष,शेतकरी संघटना, स्वप्नील देशमुख, उद्द्योजक, प्रा. डॉ. शिवाजी दळवी, गोरख पवार, प्रयोगशील शेतकरी, इंजिनीअर दिग्विजय देशमुख , मुख्तार काझी सर, आतार,शकील शेख,अशोक अडसूळ,बजरंग मेकॅनिक, सामाजिक कार्यकर्ते भंडारे साहेब,व विविध क्षेत्रातील पदाधिकारी व बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.नागेश माने यांनी केले,सूत्र संचलन शिवश्री गणेश डोके यांनी केले. तर उपस्थितांचे आभार कवी खलील शेख यांनी मानले.