वडशिवणेतील पवार विद्यालयात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे अनावरण - रोटरी क्लबचा पुढाकार -

वडशिवणेतील पवार विद्यालयात सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीनचे अनावरण – रोटरी क्लबचा पुढाकार

0

करमाळा : मुलींच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष म्हणजे संपूर्ण समाजाच्या भविष्यासोबत होणारी तडजोड आहे, ही जाणीव ठेवत रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडी तर्फे अजितदादा पवार विद्यालय, वडशिवणे (ता. करमाळा) येथे 19 डिसेंबर रोजी मुलींच्या आरोग्य, स्वच्छता व सन्मानासाठी एक अर्थपूर्ण उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात मुलींसाठी सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन, डिस्पोजेबल मशीन तसेच रोटरी हॅपी स्कूल फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ वाल्हेकर वाडीचे अध्यक्ष भरत चव्हाण, सचिव वसंतराव ढवळे, डिस्ट्रिक्ट एन्व्हायरमेंट डायरेक्टर राजेंद्र सराफ, जगदाळे कोचिंग क्लासेसचे संस्थापक व रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष गोविंद जगदाळे यांनी विद्यालयास भेट दिली. विद्यालयाचे संस्थापक गोरख पारखे यांनी मुलींच्या अडचणी समजून घेत त्यांच्या आरोग्य, स्वच्छता व सन्मानासाठी आवश्यक असलेली यंत्रणा उपलब्ध करून दिली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक भोसले यांनी रोटरी क्लबने यापूर्वी दिलेल्या संगणक व ध्वनी प्रणालीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. राजेंद्र कुमार सराफ यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास व व्यायामाचे महत्त्व समजावून सांगितले. गोविंद जगदाळे यांनी प्लास्टिकचा वापर मानव व इतर प्राण्यांसाठी किती घातक आहे हे उदाहरणांसह स्पष्ट केले. तसेच मुलींनी समाजात आत्मविश्वासाने वावरताना घ्यावयाची काळजी, प्रामाणिकपणा आणि जीवनमूल्यांवर प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांकडून शपथ घेण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री जाधव सर व भागवत सर यांनी केले, सूत्रसंचलन मी मोरे सर व खंडाळे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री देवकर सर व श्री कोरे सर यांनी केले. श्री पवार सर, भुसारा सर, श्री नागणे सर, श्री बबलू सावंत, संतोष सावंत, दादा माळी यांची उपस्थिती लाभली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!