करमाळा तालुक्यातील पहिल्या शेतकरी मॉल चे शेटफळ येथे उद्घाटन..

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी : शेटफळ (ता.करमाळा) येथे तालुक्यातील पहिल्या शेतकरी मॉलचे उद्घाटन वैभव पोळ यांच्या पुढाकाराने लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा मध्ये तालुक्यातील कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान, तहसिलदार शिल्पा ठोकडे व मान्यवरांच्या हस्ते नागराज दिनदर्शिका प्रकाशन कार्यक्रम आयोजित केला होता.


येथील लोकविकास फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्यामध्ये करमाळा तालुक्यातील केळी ऊस भाजीपाला व विविध पिकांमध्ये भरघोस उत्पादन घेणाऱ्या व उत्कृष्ट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे, ग्रामसुधार समीतीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबूराव हिरडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत, युनियन बँकेचे विभागीय प्रबंधक अतुल शेंडे, यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे गणेश करे-पाटील, जैन इरिगेशनचे विभागीय व्यवस्थापक संतोष डांगे, मंडल कृषी अधिकारी मधुकर मारकड प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.


यावेळी बोलताना ॲड बाबूराव हिरडे म्हणाले की, ग्रामीण कुटूंब व्यवस्था हा शेतीचा मुख्य आधार असून ही कुटुंबव्यवस्था जपली तर त्या कुटुंबाची शेतीमध्ये प्रगती होते. यासाठी कुटुंबातील एकमेकांच्या मताचा आदर केला पाहिजे . अल्पशिक्षित असला तरी कष्ट करण्याची तयारी जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळते हे शेटफळ येथील वैभव पोळ यांचे उदाहरण असून त्यांचा आदर्श इतरांनी घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले. तहसीलदार शिल्पा ठोकडे यावेळी म्हणाल्या की शेटफळ येथील गटशेतीचा प्रयोग हा इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक आहे त्यांनी कृषी विभागाच्या व शासनाच्या योजना सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा. धाराशिव जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनोज राऊत म्हणाले की सध्या शेती करायला परवडत नाही असा सूर दिसतो निश्चितच ही वस्तुस्थिती आहे.लोकसंखेमुळे शेतीचे लहान लहान तुकडे झाले शेतीमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने उत्पन्न व खर्चाचा ताळमेळ राहत नाही शेतीची अर्थव्यवस्था हा अभ्यासाचा व चिंतनाचा विषय असून यामध्ये धोरणात्मक आमोलाग्र बदल करण्याची गरज आहे.


यावेळी बोलताना गणेश करे पाटील म्हणाले की ग्रामीण भागात शेती मॉल ही संकल्पना शेटफळ मध्ये प्रत्यक्षात साकारण्यात आली आहे येथील गट शेतीच्या माध्यमातून ती निश्चितच यशस्वी होईल शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा कास धरून आपल्या शेतीची प्रगती करण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. जैन इरिगेशनचे संतोष डांगे यांनी शेती क्षेत्रामध्ये होत असलेले बदल शेतकऱ्यांनी समजून घेऊन आपल्या शेतीपद्धतीत बदल केले पाहिजेत स्पर्धेच्या युगात शेतकरी टिकण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष वैभव पोळ यांनी केले सूत्रसंचालन पत्रकार गजेंद्र पोळ यांनी केले तर आभार प्रशांत नाईक नवरे यांनी मांडले. या कार्यक्रमाला लोकविकास डेअरीचे दीपक देशमुख, विठ्ठल पाटील महाराज, युनियन बँकेचे शाखाधिकारी मोहन कोरडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड, आदिनाथचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत सरडे, अण्णासाहेब जगताप विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील जाधव, प्रा.नंदकिशोर वलटे धुळाभाऊ कोकरे, रामभाऊ पवार , किरण पोळ, दादासाहेब लबडे,सरपंच पांडुरंग लबडे, अनिल पोळ,विलास लबडे, तलाठी ईश्वर कदम, ग्रामसेवक सचिन सरडे नानासाहेब साळूंके, विजय लबडे, राजेंद्र साबळे, कृषी पर्यवेक्षक शिवाजी तळेकर, कृषी साह्यक सुप्रया शेलार यांच्यासह ग्रामस्थ व परिसरातील शेतकरी उपस्थित होते

  • या शेतकऱ्यांचा झाला सन्मान….
  • सचिन गव्हाणे, सचिन सरडे,आदिनाथ राऊत (चिखलठाण नंबर एक)
  • वैभव बोराडे (केडगाव)
  • संतोष नाईक नवरे(शेटफळ)
  • भाऊसाहेब राखुंडे(सोगाव पुर्व)
  • किशोर रिटे(रिटेवाडी)
  • महादेव काळोखे(उमरड)
  • शिवाजी साखरे(राजुरी)
  • सुदाम रणदिवे,(सरपडोह)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!