भारत महाविद्यालयाची प्रगती आरणे दोन सुवर्ण पदकाची मानकरी -

भारत महाविद्यालयाची प्रगती आरणे दोन सुवर्ण पदकाची मानकरी

0

करमाळा : जेऊर (ता.करमाळा) येथील भारत महाविद्यालयाची मराठी विषयाची विद्यार्थीनी कु. प्रगती दगडू आरणे ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दोन सुवर्ण पदकाची मानकरी ठरली आहे.

मराठी विषयात बी.ए. भाग १,२ व ३ च्या परिक्षेत एकुण गुणात विद्यापीठात सर्वप्रथम येणाऱ्यास दिले जाणारे श्रीमती मंदाकिनी निर्मलकुमार फडकुले सुवर्ण पदक व त्याबरोबरच कला व ललितकला विभागात विद्यापीठात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यास दिले जाणारे कै.सरस्वती निवृत्ती बंडगर सुवर्णपदक अशी दोन सुवर्ण पदके देवून तिला सन्मानीत करण्यात आले.

विद्यापीठाच्या २१ व्या पदवीदान समारंभात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, कुलगुरू प्रकाश महानवर व गोवा उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष प्रा.डॉ.गोपाल मुगेरावा यांचे हस्ते सुवर्णपदक बहाल करून प्रगती आरणे हिला सन्मानीत करण्यात आले.

प्रगती आरणे हिच्या या यशाबद्दल भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आमदार नारायण आबा पाटील, उपाध्यक्ष राजू गादिया, सचिव प्रा.अर्जुन सरक व सोलापूर विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.महेंद्र कदम यांनी प्रगती आरणे हिचे अभिनंदन केले असून तिला मार्गदर्शन करणारे मराठी विभागाचे प्रा.डॉ.संजय चौधरी, विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुनिता कांबळे व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनंत शिंगाडे यांचेही अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!