उजनी धरणातून करमाळा एमआयडीसीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचा सर्वे करण्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे आदेश..
करमाळा/ संदेश प्रतिनिधी :
करमाळा : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करमाळा कार्यक्षेत्रात पाणीपुरवठा नसल्यामुळे उद्योजक येत नाहीत यामुळे तात्काळ उजनी धरणातून करमाळा एमआयडीसीला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी योजनेचा सर्वे करा असे आदेश उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सोलापूर येथील अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले आहे.
सोलापूर येथील नियोजन भवन येथे सोलापूर जिल्ह्यातील एमआयडीसीतील प्रश्नसंदर्भात अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या बैठकीत सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी करमाळ्यातील एमआयडीसी बद्दल अनेक प्रश्न मांडले.
करमाळा एमआयडीसीतील भूखंडाचे दर कमी करावेत छोटे छोटे भूखंडाची निर्मिती करावी शिवाय या एमआयडीसी मधील पाणी उपलब्ध नसल्यामुळे मोठे उद्योजक येत नाहीत यामुळे तात्काळ पाण्याचा प्रश्न सोडवावा असे प्रश्न मांडले या बैठकीसाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर एमआयडीसी ची डेपुटी इंजिनियर श्री मगर साहेब प्लॅनिंग डायरेक्ट राजेंद्र गावडे सांगली रिजनच्या कार्यकारी संचालिका श्रीमती बिरजे मॅडम एमआयडीसी चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
त्यावेळी महेश चिवटे आणि प्रश्न उपस्थित केल्यानंतर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ या प्रश्नावर मार्ग काढावा व उजनी धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना राबवण्यासाठी प्रस्ताव सादर करावा मी निधी उपलब्ध करून देतो असे सांगितले
यावेळी बोलताना महेश चिवटे म्हणाले की, करमाळा एमआयडीसीची भूसंपादन होऊन पंचवीस वर्षे उलटून गेलेले आहेत, अद्याप एकही उद्योग येथे आलेला नाही, कोणी प्लॉट घ्यायला येथे धजवत नाही, अनेक जणांनी प्लॉट घेऊन या ठिकाणी परत दिले आहेत, सध्या या ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून एक विहिरीचे काम सुरू आहे,
ही एमआयडीसी सुरू न झाल्यामुळे करमाळ्यात बेरोजगारीचा प्रश्न निर्माण झाला आहे, तरुणांच्या हाताला काम नाही यामुळे तात्काळ ही एमआयडीसी सुरू करण्याची गरज आहे येत्या दोन वर्षात किमान दहा तरी उद्योग या ठिकाणी उभा यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.
बाळासाहेब शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रमुख महेश चिवटे यांनी करमाळा एमआयडीसीला उजनी धरणातून कायमस्वरूपी पाईपलाईन करावी जेणेकरून उद्योग या ठिकाणी येतील ही मागणी केली यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी तात्काळ याचा सर्वे करण्याचे आदेश दिले.