करमाळा नगरपरिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत ३ कोटी रुपयांचा निधी मंजुर – आ.संजयमामा शिंदे यांची माहिती


करमाळा / संदेश : प्रतिनिधी
करमाळा : महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अंतर्गत राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते, याच योजनेअंतर्गत करमाळा नगरपरिषदेला ३ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, दिनांक 24 ऑगस्ट 2023 व 29 ऑगस्ट 2023 च्या शासन निर्णयानुसार सन 2023 – 24 लेखाशीर्ष अंतर्गत करमाळा नगरपरिषदेला विविध विकास निधी मंजूर झालेला आहे. या निधीमधून करमाळा शहरातील सर्व प्रशासकीय कार्यालये सिमेंट रस्त्याने जोडली जाणार आहेत, तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, भुमिअभिलेख कार्यालय, महिला व बालविकास विभाग इत्यादी कार्यालयांना जोडणारे रस्ते सिमेंट काँक्रीट करणे या कामासाठी 1 कोटी, करमाळा बस स्टॅन्ड ते पवार हॉस्पिटल राशीन रोड रस्ता सिमेंट काँक्रेट करणे -30 लाख.

तसेच बायपास रोड ते साई कॉलनी गजानन नगर रस्ता सिमेंट काँक्रेट करणे व भूमिगत गटार यासाठी 50 लाख, बायपास रोड ते जयवंतराव जगताप घर रस्ता कॉंक्रिटीकरण व भूमिगत गटार -30 लाख, मौलाली माळ येथे दफनभूमी, पाणीपुरवठा करणे, पेविंग ब्लॉक बसविणे ,संरक्षक भिंत बांधणे व इतर सुविधांसाठी -20 लाख ,सिद्धार्थ नगर येथील ख्रिश्चन भूमी येथे प्रार्थना मंदिर बांधणे पाणीपुरवठा करणे पेविंग ब्लॉक बसविणे यासाठी 20 लाख , सावंत गल्ली येथे नगरपालिका जागेत तालीम बांधणे 20 लाख, माजी सैनिक कल्याणकारी संस्था कारगिल भवन बांधणे 20 लाख, सावंत वस्ती ते हवालदार वस्ती रस्ता खडीकरण व पूल बांधणे 15 लाख ही कामे केली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!