केंद्रिय दुष्काळी पथकाकडून करमाळा तालुक्यातील पाच गावांची पाहणी…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पाथूर्डी,घोटी,वरकुटे,सालसे व आळसुंदे या पाच गावात दुष्काळी पाहणी करण्यासाठी केंद्रिय पथकाची भेट. आळसुंदे हद्दीतील नेरले लघु पाटबंधारे तलाव,सालसे येथील नागनाथ सालगुडे यांच्या शेतातील जळालेली मका व जाणबाचा तलाव या ठिकाणची केद्रिय पथकाकडून पाहणी करण्यात आली.
यावेळी अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत यांनी नेरगा(एम.आर.ई.जी.एस.) योजनेची काम लवकर सुरू करून शेतकऱ्यांसाठी गाई गोठा शेड,कांदा शेड सह वैयक्तीक लाभाच्या योजनांचा नरेगात समावेश करण्याची मागणी केली तर सामाजिक कार्यकर्ते सतीश रूपनर यांनी रब्बी व खरीप पिकाचा पीकविमा ,जनावरासाठी चारा डेपो किंवा छावणी सुरू करणे,पिण्याच्या पाण्यासाठी टॅन्कर,जल जीवन योजना लवकर कार्यान्वीत करणे,दहिगांव ऊपसा सिंचन चे पाणी कॅनल मधून बंद पाईप ने जानबाचा तलावात सोडणे ,तलावातील गाळ काढणे या केद्रिय पथकाकडे मागण्या केल्या.
पोलिस पाटील ऊर्मिला पवार यांनी जल जीवन योजनेअंर्तगत वाड्या वस्त्यावर नळ जोडणी करून पाणी पुरवठा करण्याची मागणी केले या दुष्काळी केंद्रिय पथकाच्या दौऱ्यात केंद्र शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सचिव सल्लागार मुरलीधरण यांच्यासह केंद्र व सार्वजनिक वितरण विभागाच्या ऊप सचिव सरोजनी रावत ,ऊप जिल्हाधिकारी (रोजगार हमी) चारूशिला देशमुख,जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागार दामा,ऊपविभागीय अधिकारी प्रियंका अंबेकर,ऊपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, तहशिलदार शिल्पा ठोकडे,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक एम.जे. शेख साहेब,ऊपविभागीय जल संधारण अधिकारी देवेंद्र कदम, दहिगांव ऊपसा सिंचन योजनेचे ऊप अभियंता संजय आवताडे,तालुका कृषी अधिकारी संजय वाकडे ,नायब तहसिलदार विजयकुमार जाधव ,गट विकास अधिकारी देवेंद्र सारंगकर,भाजप चे तालुका अध्यक्ष गणेश चिवटे,जलसंधारण अधिकारी विशाल फावडे व अक्षय काळे,मंडल अधिकारी अमित कलेटवाड, पशु संर्वधन अधिकारी डाँ.यादव,सरपंच सतीश ओहोळ,ग्रामसेवक अनिल कब्जेकर ,तलाठी बिराजदार,अंगणवाडी सेविका,आशावर्कर सह बहुसंखेने शेतकरी उपस्थित होते.