वरकटणे ग्रामस्थांचा प्रेरणादायी उपक्रम – “रक्तदान हेच खरे महादान” म्हणत १६० तरुणांचे रक्तदान -

वरकटणे ग्रामस्थांचा प्रेरणादायी उपक्रम – “रक्तदान हेच खरे महादान” म्हणत १६० तरुणांचे रक्तदान

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी : वरकटणे (ता. करमाळा) येथे “जीवन वाचवण्यापेक्षा मोठे दान दुसरे नाही… आणि तेच रक्तदान!” या भावनेला मूर्त रूप देत वरकटणे गावात अखंड हरिनाम सप्ताह व श्री भैरवनाथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समाप्तीच्या निमित्ताने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराला पंचक्रोशीतील युवकांचा प्रचंड उत्साह लाभला आणि एकूण १६० तरुणांनी स्वेच्छेने रक्तदान केले. या कार्यासाठी कमला भवानी ब्लड सेंटर, करमाळा यांनी तांत्रिक सहकार्य दिले. रक्ताचा प्रत्येक थेंब एखाद्याच्या जीवनात नवी उमेद निर्माण करेल, याची जाणीव प्रत्येक दात्याच्या चेहऱ्यावर दिसत होती.

शिबिराचे उद्घाटन गावातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. रक्तदात्यांचे स्वागत पुष्पगुच्छ, पाण्याचा जार व प्रमाणपत्र देऊन करण्यात आले. मान्यवरांनी उपस्थितांना रक्तदानाचे महत्त्व पटवून सांगितले आणि “रक्तदान हा केवळ परोपकार नव्हे, तर तो जीवन वाचवणारा संकल्प आहे” असा संदेश दिला.

या सामाजिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ व तरुण मंडळींनी एकदिलाने मेहनत घेतली. नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंत सर्वांनी खांद्याला खांदा लावून सहभाग नोंदवला.“रक्तदानामुळे शरीरातील रक्त कमी होत नाही, उलट माणुसकीचा मान वाढतो. म्हणून रक्तदान करा आणि एखाद्याला नवजीवन द्या” — हा सकारात्मक संदेश या शिबिरातून सर्वत्र पसरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!