“दादाश्री ऑक्सिजन पार्क” मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील शाळांमध्ये 1 लाख 11 हजार 111 झाडांचे वृक्षारोपण करण्याचा मानस..
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : दादाश्री फाउंडेशन वीट यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे या “दादाश्री ऑक्सिजन पार्क” मोहिमेमधून जिल्ह्यातील एकूण प्रत्येक शाळांमध्ये एकुण मिळुन एक लाख 11 हजार 111 झाडांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे त्याचा शुभारंभ आय.ए.एस.बालाजी मंजुळे यांच्या हस्ते जि प प्रा शाळा पोंधवडी (ता.करमाळा) येथून सुरू करण्यात आला.
याप्रंसगी वृक्षारोपण लागवड करताना बालाजी मंजुळे यांनी आपले व्यक्त केले, ते म्हटले कि, पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास यासाठी वृक्षारोपण गरजेचे असून, माणसांनी झाडे लावणे गरजेचे आहे, काका काकडे यांच्या दादाश्री फाउंडेशन चे वृक्षारोपण काम हे कौतुकास्पद आहे, दादाश्री फाउंडेशन ही संस्था वृक्षारोपण चळवळीतील अग्रगण्य संस्था आहे. असेही त्यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमासाठी आय.ए.एस.बालाजी मंजुळे ,राजकुमार पाटील गटशिक्षणाधिकारी करमाळा ,जिल्हा परिषद सदस्य बिभीषण आवटे ,कृषी उत्पादन बाजार समिती संचालक आनंद कुमार ढेरे, वीटचे सरपंच उदय ढेरे , पोंधवडीचे सरपंच मनोहर कोडलिंगे, अंजनडोह चे सरपंच अमोल शेळके ,विहाळ चे सरपंच मोहन मारकड, युवा उद्योजक दिगंबर चोपडे ,जीवन आवटे ,संतोष आबा ढेरे सचीन गणगे,अनिल चोपडे दादाश्री फाउंडेशनचे अध्यक्ष माधव जाधव अमोल कोडलिंगे ,महादेव भिसे अमोल गाडे,राम मंजुळे पो.कॉ.पोळ यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या, म्हेत्रे गुरुजी यांच्या सूत्रसंचालनाने सर्वांची मने जिंकली.
गायकवाड गुरुजी व मुख्याध्यापक साबळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनिल जाधव, उपाध्यक्ष गंगाराम अनारसे व सर्व कर्मचारी वृंद यांनी योग्य नियोजन केले..वृक्षारोपण कार्यक्रमाच्या नंतर श्री भिसे यांच्या शिवशंकर सार्वजनिक वाचनालयाला आय.ए.एस.बालाजी मंजुळे यांनी सदिच्छा भेट दिली,त्याचबरोबर ग्रामपंचायत विहाळ येथेही आय.ए.एस.बालाजी मंजुळे यांनी सदिच्छा भेट दिली..वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आवर्जून आंध्रप्रदेशावरून येऊन उपस्थित राहिल्याबद्दल काका काकडे यांनी आय.ए.एस.बालाजी मंजुळे यांचे विशेष आभार मानले.