भारत प्रायमरी स्कूल, जेऊर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

करमाळा (दि 23): संपूर्ण जगभरात २१ जून रोजी साजऱ्या होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून भारत प्रायमरी स्कूल, जेऊर येथे आज सकाळी ७.३० वाजता योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि भारत मॉन्टेसरीचे शिक्षक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
या प्रसंगी योग शिक्षक उदय केकान यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या योगासने मार्गदर्शनासह करून घेतली. त्यांनी पद्मासन, वज्रासन, कपालभाती, अनुलोम-विलोम, सूर्यनमस्कार तसेच सूक्ष्म व्यायाम प्रकार शिकवले. विद्यार्थ्यांनी आनंदाने व शिस्तबद्ध पद्धतीने सर्व योगासने केली. व्यायामाबाबतची मुलांची आत्मीयता विशेषतः जाणवली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी उदय केकान यांनी योगासनेचे आरोग्यदायी महत्त्व स्पष्ट केले आणि विद्यार्थ्यांकडून रोज योग करण्याचे अभिवचन घेतले. मुख्याध्यापक श्री. दीपक व्यवहारे सर यांनी उदय केकान सरांचे मनःपूर्वक आभार मानले आणि त्यांच्या पुढील सहकार्याचे स्वागत केले.

कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष लोकनेते मा. नारायण आबा पाटील, सचिव श्री. अर्जुनराव सरक सर, तसेच संचालक पृथ्वीराज भैय्या पाटील यांनी दूरध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेचे सर्व शिक्षक – गरड सर, अमोल पाटील सर, देशमुख मॅडम, गुळमे सर, भोसले मॅडम, नितीन पाटील सर, हजारे सर, सरडे मॅडम, शेख मॅडम आदी उपस्थित होते.