करमाळ्यात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय ‘योग दिन’ साजरा…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : संपूर्ण भारतात २१ जुन हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जातो. योगासने ही भारत देशातील एक प्राचीन काळापासून चालत आलेली विद्या आहे. करमाळा तालुक्यातही आज (ता.२१) योग दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा येथे योग दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने करमाळा येथील कन्या विद्यालयात पतंजली योग समितीचे हनुमानसिंग परदेशी यांनी योगाचे प्रात्यक्षिक सकाळी ७ ते ८ या वेळेत करून घेतले. त्यांच्यासोबत पतंजली योग समितीचे शिक्षक राजूकाका वाशिंबेकर, रामचंद्र कदम, पंडित गुरुजी, प्रदीप वीर , प्रवीण देवी व आशिष सोनी उपस्थित होते. या योग कार्यक्रमासाठी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे , शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, ज्येष्ठ नेते राधेश्याम देवी, जिल्हा चिटणीस विनोद महानवर, तालुका सरचिटणीस आजिनाथ सुरवसे, सोशल मीडिया प्रमुख नितीन झिंजाडे, प्रवीण गायकवाड, बाळासाहेब कुंभार, दिनेश मडके, जयंत काळे पाटील, सोमनाथ घाडगे , गणेश महाडिक, प्रविण बिनवडे, भीष्माचार्य चांदणे सर ,पूजा माने , किरण शिंदे, सचिन कानगुडे, लखन शिंदे, शंभुनाथ मेरुकर, शैलेश राजमाने ,गणेश वाशिंबेकर, प्रसाद गेंड, कपिल मंडलिक, अक्षय बोकण , किरण हाके, नंदकुमार कोरपे ,प्रवीण शेळके, भूषण पाटील,विनोद इंदलकर ,महादेव गोसावी, संतोष जवकर यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
तसेच महात्मा गांधी शैक्षणिक संकुलात शंभूराजे जगताप यांनी जागतिक योग दिन साजरा केला. यावेळी आर.डी.कदम यांनी योगासनाचे विवीध प्रकार करून घेत योगासना चे महत्व पटवून दिले . आजी माजी खेळाडू विदयार्थी विद्यार्थिंनीनी स्टेजवरून योगासने सादर केले. यावेळी प्राचार्य पाटील बाळकृष्ण यांनी उपस्थित योगप्रेमींचे स्वागत केले, प्रास्ताविक विज्ञान शाखा विभाग प्रमुख प्रा.विजय पवार यांनी केले तर उपप्राचार्य अनिस बागवान यांनी आभार मानले, यावेळी पर्यवेशिका सुनिता नवले, पर्यवेक्षक रमेश भोसले , योगप्रेमी जितेंद्र चांदगुडे , क्रिडा शिक्षक सचिन दळवे, श्री ढेरे आदी उपस्थित होते.
जागतिक योग दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला. या वेळी कु.श्रावणी राहूल बाबर हिने विविध प्रकारच्या योगासनांचे प्रात्यक्षिक केले सोबत महाविद्यालयातील सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी योग प्रात्यक्षिके केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल. बी. पाटील होते. संस्थेचे सचिव विलासराव सुमरे सरांनी वृक्ष संवर्धनाबाबत सर्वांना अवाहन केले. सदर कार्यक्रमास महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी. क्रीडा विभाग यांचा सहभाग होता, कार्यक्रमाचे नियोजन व सुत्रसंचलन प्रा.डॉ अतुल लकडे संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण यांनी केले तर आभार वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य डॉ. अनिल साळुंखे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक व क्रीडा शिक्षक श्री राम काळे, रा.से.यो.कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रमोद शेटे, एन.सी.सी. विभागाच्या प्रमुख लेफ्टनंट डॉ. विजया गायकवाड यांनी श्रम घेतले.