महात्मा गांधी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा - २००० विद्यार्थ्यांचा सहभाग -

महात्मा गांधी विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा – २००० विद्यार्थ्यांचा सहभाग

0


करमाळा (दि. 23) –महात्मा गांधी विद्यालयात २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यालयाचे सेवानिवृत्त सहशिक्षक आणि योगाचार्य श्री. आर. बी. कदम यांनी विविध प्रकारची योगासने प्रत्यक्ष करून दाखवत विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला विज्ञान विभाग प्रमुख श्री. विजयकुमार पवार यांनी योगासनांचे शास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्व विशद केले. यानंतर सकाळी व दुपारी झालेल्या दोन सत्रांतून एकूण सुमारे २००० विद्यार्थी सहभागी झाले.



कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. बी. के. पाटील, उपमुख्याध्यापक श्री. बागवान, पर्यवेक्षक सौ. नवले मॅडम, श्री. भोसले सर, विज्ञान विभाग प्रमुख श्री. पवार यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.योग दिनाच्या आयोजनाने संपूर्ण विद्यालय परिसरात आरोग्यवर्धक आणि सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!