मातोश्री चांगुणाबाई सिद्राम इंगळे स्मृती पुरस्कारासाठी साहित्यिकांना अवाहन

करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा, ता १ : वडशिवणे (ता. करमाळा) येथील विश्वकर्मा तरुण मंडळाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा मातोश्री चांगुणाबाई सिद्राम इंगळे स्मृती पुरस्कार याही वर्षी प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी साहित्यिकांकडून समिक्षा ग्रंथ व संपादन साहित्य मागविण्यात येत असून, 1 जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत प्रकाशित झालेल्या साहित्याचा विचार केला जाणार आहे.
मातोश्री चांगुणाबाई सिद्राम इंगळे यांच्या पवित्र स्मरणार्थ, साहित्यिक बाबुराव सिद्राम इंगळे यांच्या वतीने हा पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे असून, इच्छुक साहित्यिकांनी आपल्या साहित्याच्या दोन प्रती, अल्प परिचय व छायाचित्रासह 10 मार्च 2026 पर्यंत पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यापूर्वी या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने मा. प्रा. दयासागर बन्ने व प्रा. रामचंद्र इकारे यांचा गौरव करण्यात आला आहे.
साहित्य पाठविण्याचा पत्ता पुढीलप्रमाणे आहे —
श्री. बाबुराव सिद्राम इंगळे सर,
56, आर्य चाणक्य नगर,
मारुती मंगल कार्यालयाशेजारी,
विजापूर रोड, सैफुल, जुळे सोलापूर – 413008.
मोबाईल : 9421071929
या संदर्भातील माहिती विश्वकर्मा तरुण मंडळाचे अध्यक्ष सोमनाथ मधुकर टकले यांनी दिली. यावेळी दिनेश आदलिंगे, श्री. दत्तात्रेय पिसाळ, डॉ. जनार्दन भोसले तसेच बाबुराव इंगळे उपस्थित होते. सदर पुरस्कारामुळे साहित्यिकांना प्रोत्साहन मिळून दर्जेदार साहित्यनिर्मितीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.




