नॅशनल अबॅकस स्पर्धेत ईशानी गायकवाड महाराष्ट्रात प्रथम -

नॅशनल अबॅकस स्पर्धेत ईशानी गायकवाड महाराष्ट्रात प्रथम

0

करमाळा : यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, करमाळा येथे 15 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या नॅशनल अबॅकस कॉम्पिटिशन या राज्यस्तरीय स्पर्धेत कु. ईशानी अमोल गायकवाड हिने सीनियर लेव्हलमध्ये महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला.

इयत्ता पहिली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वीट येथील विद्यार्थिनी असलेल्या ईशानीने अवघ्या 4 मिनिटे 52 सेकंदांत 100 पैकी 100 अचूक गणिते सोडवत उल्लेखनीय कामगिरी केली. तिच्या या यशामुळे ती राज्यात अव्वल ठरली आहे.

ईशानीचे वडील प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय, करमाळा येथे ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. या स्पर्धेसाठी तिला शिक्षिका मंजुश्री मुसळे यांचे मार्गदर्शन लाभले. ईशानीच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!