हृदयविकाराच्या झटक्याने जगदीश निलाखे यांचे निधन -करमाळेकरांवर शोककळा

0

करमाळा /संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.३:  येथील महात्मा गांधी विद्यालयातील दिवंगत शिक्षक कै. निलाखे सर यांचे चिरंजीव श्री. जगदीश निलाखे ( वय-६३)यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक जाण्याने करमाळा शहरात शोककळा पसरली आहे.

जगदीश निलाखे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण करमाळा येथे झाले. पुढे त्यांनी अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून उपअभियंता (Sub-Engineer) म्हणून करमाळा येथे काही काळ सेवा बजावली होती.  ते कर्तव्यनिष्ठा व संयमी स्वभावामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चांगले परिचित होते.

त्यांच्या अकाली निधनाने निलाखे कुटुंबावर मोठा आघात झाला असून करमाळेकरांनी एक संवेदनशील, मनमिळावू व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!