केम सोसायटीच्या चेअरमनपदी दत्तात्रय बिचितकर यांची बिनविरोध निवड

केम(संजय जाधव): केम येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटिच्या चेअरमनपदी माजी आमदार जयवंतराव जगताप गटाचे कट्टर समर्थक दत्तात्रय बलभिम बिचितकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
दिलीप दौड,,दयानंद तळेकर, विलास बिचितकर,, किरण तळेकर बाळासाहेब देवकर अच्युत काका पाटिल, महादेव पारखे आनंद शिंदे, चंद्रकांत दौंड, नवनाथ कोळेकर, कौशल्या दौड, सारिका शिंदे ओहोळ आदी जणांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकित एकमताने बिचितकर यांची बिनविरोध निवड करण्याचा निर्णय घेण्यात आला बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी विष्णू माने यांनी केली.
या निवडीनंतर दत्तात्रय बिचितकर यांचा सत्कार माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सागर दौड,भैरू दौड, राहुल बिचितकर, चंदू बिचितकर,दिपक बिचितकर, ओंकार जाधव, तानाजी बिचितकर, डाॅ,ओंकर बिचितकर, प्रकाश तळेकर विजय तळेकर शुभम बिचितकर, दत्ता दौड, सचिन तळेकर आदि उपस्थित होते.

सोसायटीच्या सर्व संचालकानी माझ्यावर जो विश्वास दाखवला, त्याला मी तडा जाऊ देणार नाही. मी सोसायटिच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करेल.
● दत्तात्रय बिचितकर, नूतन चेअरमन,






