उमरड येथील जय भवानी तरुण मंडळाच्या सामाजिक कार्याचा करमाळा पोलिसांकडून करण्यात आला गौरव

केम (संजय जाधव) : करमाळा ठाणे पोलीस सोलापूर ग्रामीण गणेश उत्सव 2024 बक्षीस वितरण समारंभामध्ये उमरड येथील जय भवानी तरुण मंडळ यांना एक गाव एक गणपती बसवून आदर्श निर्माण केल्याबद्दल प्रशस्तीपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले जय भवानी तरुण मंडळाने गावामध्ये वृक्षारोपणाची उत्कृष्ट असे काम केले आहे. त्याचप्रमाणे गावामध्ये गणपती चे मंदिर उभारणीचे काम सुरू आहे.या सर्व कामाची दखल घेऊन करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घुगे यांनी प्रशस्तीपत्र देऊन व ट्रॉफी देऊन सन्मानित केले.
या पुढील काळात जय भवानी तरुण मंडळाने उमरड गावामध्ये व्यसन मुक्त अभियान व वृक्षारोपण अभियान राबवावे आशा मार्गदर्शक सूचनाही केल्या.यावेळी उपस्थित जय भवानी तरुण मंडळाचे अध्यक्ष गोवर्धन कोठावळे, अण्णा पठाडे, बाप्पू बदे, मनोज पठाडे, पोलीस पाटील अंकुश कोठावळे आदी जण उपस्थित होते.






