करमाळ्यात ‘मराठा समाजाच्या’ आरक्षणासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने ‘जेल भरो’ आंदोलन..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : मराठा समाजाच्या आंदोलनासाठी करमाळा शहरातून सकल मराठा समाजाच्यावतीने आज (ता.३१) शहरातील पोथरेनाका परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला कु.जान्हवी राहुल सावंत हिच्या हस्ते पुष्पहार घालून याठिकाणी कु.जान्हवी हिने सकल मराठा समाजाच्यावतीने भाषण करून ‘जेलभर आंदोलन’ करण्यात आले, याप्रसंगी सकल मराठा समाजाच्यावतीने शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

सध्या मराठा समाजाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर मनोज जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा आरक्षणासाठी विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे, यामध्ये करमाळा सकल मराठा समाजाच्या वतीने सध्या साखळी पद्धतीने उपोषण सुरू असून आज ‘जेलभरो आंदोलन’ शांततेत करण्यात आले.

मराठा समाजाच्या या उपोषणाला मराठा समाज व अन्य समाजाचाही प्रचंड पाठींबा मिळत आहे. एवढेच नाहीतर तालुक्यातील ५० गावात राजकीय पक्षाच्या नेतेमंडळींना गावात प्रवेश बंदी आहे. त्यामुळे हे आंदोलन आणखीच तीव्र बनले आहे. ‘चुलीत गेले नेते आणि पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचे लक्ष’, “मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष व नेत्यास गावात प्रवेश नाही..!” असा नारा मराठा समाजाने दिला असून तशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना गावागावातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी दिले आहेत.

आज (ता.३१) शहरातील पोथरेनाका परिसरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला कु.जान्हवी राहुल सावंत हिच्या हस्ते पुष्पहार घालून याठिकाणी कु.जान्हवी हिने सकल मराठा समाजाच्यावतीने भाषण करून ‘जेलभर आंदोलन’ करण्यात आले, याप्रसंगी सकल मराठा समाजाच्यावतीने शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. याप्रसंगी करमाळा पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हे स्वतः हजर राहुन संपुर्ण पोलीस फौज तैनात ठेवण्यात आली होती. जेल भरो साठी पोलिसांनी दोन बसेस उभा केल्या होत्या. यानंतर या सर्व कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले.

संबंधित बातमी : ‘मराठा समजाला आरक्षण’ मिळण्यासाठी तालुक्यातील ५० गावात नेत्यांना प्रवेश बंदी – करमाळा तहसीलमध्ये साखळी उपोषण सुरू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!