जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत जेऊर कडकडीत बंद
केम (संजय जाधव) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या त्यांच्या मूळगावी उपोषण सुरु असून आज उपोषणाचा सहावा दिवस आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जेऊर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने ‘जेऊर बंद’चे आवाहन केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक व व्यापारी यांनी जेऊर कडकडीत बंद ठेवले.
राज्य शासनाच्या काही मराठा धोरण आखलेल्या नेत्यांच्या हातचे बाहुले बनून मराठा योध्दा जरांगे पाटिल यांच्यावर बिनबुडाचे आरोप करून जरांगे पाटिल यांचाच नव्हे तर संपूर्ण मराठा समाजाचा अवमान करणारे बार्शी तालूक्याचे आमदार राजेंद्र राऊत यांचा जेऊर ग्रामस्थांच्या बैठकित जाहिर निषेध व्यक्त करण्यात आला. येत्या काळात मराठा समाज त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही.
–नितीन खटके पुणे विभागीय कार्याध्यक्ष संभाजी ब्रिगेड