जेऊर कडकडीत बंद – जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला व्यापारी वर्गाने दिला पाठिंबा
केम (प्रतिनिधी/संजय जाधव) : मराठा आरक्षणा संदर्भात सरकारने आश्वासित केल्याप्रमाणे सगे-सोयरे अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे व लवकरात लवकर अंमलबजावणी सुरू करावी, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे आमरण उपोषण सुरू आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने मराठा बांधवांनी 14 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती. जेऊर (ता.करमाळा) येथील संभाजी ब्रिगेड ने केलेल्या आव्हानाला जेऊर व्यापारी वर्गाने मोठ्या संख्येने व सक्रिय पणे 100% पाठिंबा देत कडकडीत बंद पाळला.