करमाळा शहराला होणारा पाणी पुरवठा पूर्ववत करा – जितेश कटारिया यांची मागणी…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सध्या सर्वत्र समाधानकारक पाऊस झाला आहे, तसेच सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्याला वरदायिनी ठरवलेले उजनी धरण देखील 100% पेक्षा जास्त झाले आहे, आणि आता सणासुदीचे दिवस सुरू झाले आहेत, त्यात करमाळा शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळित होत आहे, त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची विनाकारण धावपळ होत आहे.नगरपालिका प्रशासनाने शहराला पूर्वी प्रमाणे दररोज पुरेशा दाबाने स्वच्छ पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे अशी मागणी भाजपा सरचिटणीस जितेश कटारिया यांनी केली आहे.
गेल्यावर्षी असमाधान कारक पाऊस झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमी झाला होता. त्यामुळे करमाळा शहराला पाणी नगरपालिका प्रशासनाकडून 3-4 दिवसातून एकदा होत होते, परंतु सध्या पावसाळा असून शिवाय सर्वत्र पाणीसाठा उपलब्ध असताना शहरात वेळेवर पाणीपुरवठा केला जात नाही, त्यामुळे यापुढे नगरपालिका प्रशासनाने करमाळा शहराला पूर्वी प्रमाणे दररोज पुरेशा दाबाने स्वच्छ पाणी नागरिकांना उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी भाजपा सरचिटणीस जितेश कटारिया यांनी केली आहे.