पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासनाधिकारी सुरेश जाधव यांचा उद्या 27 ऑगस्ट ला सेवापूर्ती गौरव सोहळा..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : पंचायत समितीचे कनिष्ठ प्रशासनाधिकारी सुरेश हनुमंत जाधव यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा उद्या 27 ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केला असून, या गौरव सोहळ्यानिमित्त श्री.जाधव यांचा सन्मान ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड.बाबुराव हिरडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते कल्याणराव देशमुख, युवा नेते शंभूराजे जगताप, सामाजिक कार्यकर्ते गणेश करे-पाटील, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर, प्रभारी गटविकास अधिकारी राजाराम भोंग, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे, केंद्र समन्वयक दयानंद चौधरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन श्रीदेवीचामाळ करमाळा येथील अथर्व मंगल कार्यालय येथे करण्यात आला आहे तसेच या कार्यक्रमानंतर दुपारी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुनंदा जाधव, स्वप्निल जाधव व जाधव परिवारातर्फे करण्यात आले आहे.





