करमाळ्यातील जैन संघटनेचा 'गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार' हा उपक्रम चांगला - पो.नि.ज्योतीराम गुंजवटे -

करमाळ्यातील जैन संघटनेचा ‘गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार’ हा उपक्रम चांगला – पो.नि.ज्योतीराम गुंजवटे

0

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील भारतीय जैन संघटनेच्यावतीने आजपर्यंत अनेक समाज उपयोगी काम केले असून, गाळमुक्त तलाव गावयुक्त शिवार तसेच संपूर्ण गाव सुजलाम सुफलाम करण्याचा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी व्यक्त केले.

भारतीय जैन संघटना सोलापूर जिल्ह्याच्यावतीने करमाळा तालुक्यातील तलावाचे पुनरूज्जीवन करून गाव जलाने आत्मनिर्भर करण्याच्या प्रचार रथयात्रेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना व्यक्त केले.या कार्यक्रमास गटविकास अधिकारी राजेंद्र भोंग नायब तहसीलदार सुभाष बदे विभागीय अध्यक्ष प्रवीण बलदोटा विभागीय सचिव रवींद्र गांधी सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपशेठ बलदोटा उपस्थित होते.

पुढे बोलताना गुंजवटे म्हणाले की, जैन समाजाने पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात जलक्रांती करण्यासाठी आपली योगदान दिले आहे कोरोना काळातही अनेकांचे प्राण वाचवण्याचे काम केले असून, सर्व धर्म सामुदायिक विवाह सोहळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत अशा माध्यमातून समाजसेवेचे व्रत जपण्याचे काम केले आहे. त्यांच्या समाजाच्या हितासाठी कल्याणाकारी उपक्रमास आपले सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले या कार्यक्रमास निलेश कटारिया विक्रांत मंडलेचा जे एच कलेक्शनचे आकाश लुणिया, मनोज पितळे संतोष बलदोटा राजेश मुथा संतोष मुनोत रवींद्र संचेती सम्राट गांधी प्रीतम दोशी तसेच संघटनेचे सर्व पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.

करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ग्रामसेवक सरपंच ग्रामस्थांना सूचना देऊन तलावाचे पुनर्जीवन करण्यासाठी गाव जल आत्म निर्माण करण्याच्या मिशनमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करणार असुन, सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रदीपशेठ बलदोटा यांच्या व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करमाळा तालुक्यामध्ये शंभर टक्के तलावाचे पुनर्जीवन करणार असल्याचे गटविकास अधिकारी राजेंद्र भोग यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!