मुस्लिम एकता संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी कदिर पटेल
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.२५: मुस्लिम एकता संस्थापक अध्यक्ष आसिफ भाई जमादार यांनी हजरत सय्यद वली चांद पाशा सुफी कादरी यांचा आशीर्वाद घेऊन आवाटी येथे रविवारी (दि.25)रोजी बैठक घेऊन या बैठकीत संघटनेच्या जिल्हाअध्यक्ष पदी रफीक खान तर करमाळा तालुका अध्यक्ष पदी कदीर पटेल यांची निवड केली आहे.
सदर नियुक्तीचे पत्र मुस्लिम एकता सामाजिक संघटनेचे राज्याचे संस्थापक अध्यक्ष असिफभाई जमादार यांच्या हस्ते देण्यात आले
आवाटी येथील रफीक खान व कदीर पटेल यांचा सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढाकार असतो. या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आली. भविष्यात आपण गोरगरिबाची सेवा करून मुस्लिम व बहुजनांची अन्यायाची, हक्काची, संघर्षाची लढाई एकत्र मिळून खांद्याला खांदा लावून लढू व संघटनेचे नाव महाराष्ट्रात लौकिक करू असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले.
याप्रसंगी बाबु भाई मुलाणी, ऍड.वसीम शेख, ताहेर खान, मुजीब पटेल,पप्पू मुजावर, गौस शेख, जफर पठाण, मकसूद मोगल आदी उपस्थित होते.