हिवरवाडी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी कैलास पवार यांची निवड

करमाळा (दि.२२): गावाच्या सामाजिक ऐक्यासाठी महत्त्वाची मानली जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती, हिवरवाडीच्या अध्यक्षपदी कैलास पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या प्रसंगी जयराज चिवटे (माजी सरपंच), राजेंद्र मेरगळ, चतुर्भूज इरकर, हनुमंत सांगळे, बबन पवार, धनंजय पवार, गणेश इवरे, सौरभ पवार, राजेंद्र इरकर, संजय इरकर, रामभाऊ पवार, नामदेव पवार, हिरालाल इवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडीनंतर नूतन अध्यक्ष कैलास महाराज पवार म्हणाले की, “गावातील वाद, तंटे मिटवून एकतेचे वातावरण निर्माण करणे हीच खरी सेवा आहे. माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला पात्र राहून गावात ऐक्य, भाईचारा आणि विकास यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.”
गावातील सलोखा, ऐक्य आणि प्रगतीसाठी नव्याने निवडून आलेल्या समितीचे योगदान मोलाचे ठरणार असल्याचा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.



