कमलादेवी संवर्धन कामास ५१ हजार रुपयांची देणगी

करमाळा(दि.७) : श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे. काल गुरुवारी (दि.६) कल्पना बालाप्रसाद राठोड रा. पुणे यांच्याकडून रु. ५१ हजार रुपयांची देणगी मंदिराच्या संवर्धन कामास मिळाली.
यानिमित्ताने त्यांचा सत्कार श्री.विजय लावंड, सुशील राठोड विश्वस्त, यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी अभिषेक राठोड , विशाल राठोड, अशोक गाठे ,रघुनाथ खटके, पद्माकर सूर्यपुजारी, व राठोड परिवार उपस्थित होते.
श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती प्रथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे.





