रांगोळी, डान्स, भारुड या स्पर्धेसह ‘कमलाई फेस्टिवल’ मोठ्या जल्लोषात संपन्न

करमाळा (दि.१५) – नवरात्रमहोत्सव निमित्त श्रीमंत राजेरावरंभा तरुण मंडळ श्रीदेवीचामाळ आयोजित ‘कमलाई फेस्टिवल’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कमलाई फेस्टिवलचे यंदा 18 वे वर्षे होते.

सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील रांगोळी स्पर्धा, डान्स स्पर्धा, भारुडाचा कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्यांना एक आकर्षक ट्राॅफी व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.ही बक्षिसे करमाळा तालुक्यातील विविध मान्यवरांच्या सौजन्याने देण्यात आली. (या सर्वांची नावे खाली दिलेल्या कार्यक्रम पत्रिकेत दिली आहेत). याच कार्यक्रमात तपश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेठ खाटेर यांना ‘श्री कमलाईदेवी गौरव पुरस्कार’ देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी शेखर जोगळेकर यांनी सूत्रसंचालन केले. तर परीक्षक म्हणून श्री. नरारे सर, श्री. लष्कर सर व श्री सोरटे सर यांनी काम पाहिले. फेस्टिवल यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सरपंच श्री.राहुल सिद्धेश्वर सोरटे उपसरपंच सचिन दिलीप शिंदे तंटामुक्तीचे अध्यक्ष सचिन चोरमले मा.सरपंच श्रीराम सोरटे कमलाई फेस्टिवल अध्यक्ष पै.अभिजीत कामटे आदित्य पवार रोहन पवार प्रतीक चव्हाण अक्षय बेद्रे रत्नदीप पुजारी नवनाथ भैय्या सोरटे सागर चव्हाण आकाश सोरटे महेश पवार आप्पासाहेब अनभुले शरद दळवी सर अविनाश सावंत व सर्व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.






