जगदंबा देवी संस्थेचा ‘कमलाईदेवी गौरव पुरस्कार’ करे-पाटील यांना प्रदान..
करमाळा / संदेश प्रतिनिधी
करमाळा : येथील श्री जगदंबा देवी बहुउद्देशीय संस्था आणि अन्नछत्र मंडळ श्रीदेवीचामाळ यांचे वतीने राज्यस्तरीय श्री कमलादेवी गौरव पुरस्कार येथील यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश करे-पाटील यांना समारंभपूर्वक देण्यात आला आहे. हा पुरस्कार कमलाई फेस्टीव्हल २०२३ च्या समारंभात बक्षीस वितरण प्रसंगी प्रदान करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत, स्त्रीरोग तज्ञ डॉ.कविता कांबळे, अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष नवनाथ दादा सोरटे, सरपंच महेश सोरटे, उपसरपंच दिपक थोरबोले, प्राचार्य बाळासाहेब नरारे आदी मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष श्रीकांत चव्हाण, तंटामुक्त अध्यक्ष सचिन चोरमोल, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, नवनाथ भैय्या सोरटे, दत्तात्रय रेगुडे, राजेंद्र फलफले, प्रतिक चव्हाण, केतन काश्वीद, राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष वारे, ग्रामपंचायत सदस्य अमोल चव्हाण, संतोष पवार, अक्षय बेंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते.