करमाळा अर्बन बँकेच्या चेअरमनपदी कन्हैयालाल देवी तर व्हा.चेअरमनपदी महादेव फंड बिनविरोध निवड..

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा अर्बन बँकेच्या चेअरमन व व्हा.चेअरमनपदासाठी आज (ता.१७) ११ वाजता बँकेच्या देवी सभागृह येथे नवनिर्वाचित संचालकाची बैठक आयोजित करण्यात आली, या बैठकीत कन्हैयालाल गिरधरदास देवी यांनी चेअरमन पदाकरीता व नवनिर्वाचित संचालक महादेव आजिनाथ फंड यांनी व्हाईस चेअरमनकरीता नामनिर्देशन पत्र दाखल केले, यामध्ये चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज व व्हाईस चेअरमन पदासाठी एकमेव अर्ज आल्याने चेअरमनपदासाठी कन्हैयालाल देवी व व्हा.चेअरमनपदी महादेव फंड या दोघांचीही बिनविरोध निवड झाली आहे.
या बैठकीचे अध्यक्षस्थान सहाय्यक निबंध सहकारी संस्था करमाळा तथा अध्याशी अधिकारी दिलीप तिजोरे यांनी भूषवले तसेच या सभेस नवनिर्वाचित एकूण 15 संचालकांपैकी 14 संचालक बैठकीस हजर होते, मात्र गोरख मच्छिंद्र जाधव हे संचालक सदर बैठकीस गैरहजर होते सर्व उपस्थित संचालकांना बैठकीचा अजंठा मिळाला त्याची खात्री करून बैठकीत सुरुवात झाली.
याप्रसंगी बोलताना श्री.तिजोरे यांनी म्हटले की, या निवडीनंतर बँकेचे संचालकपद हे जबाबदारीचे पद असून बँकेच्या ठेवीदाराचे ठेवीचे रक्षण करणे व कर्जाची वेळेवर वसुली करणे याचे गमक ज्या संचालकांना समजलेले आहे, त्या संचालकांनी त्या बँका प्रगतीपथावर नेलेले आहे. सर्व संचालकाकडून भविष्यकाळात चांगली वसुली होईल याची मी अपेक्षा करतो असे श्री. तिजोरी यांनी सांगितले.
यावेळी चेअरमन कन्हैयालाल देवी म्हणाले की, बँक बिनविरोध करून सर्व सभासदांनी माझ्यावर व माझ्या सहकार्यावर जो विश्वास दाखवलेला आहे, आम्ही त्या विश्वासास पात्र राहू, लवकरच बँकेवर असणारे निर्बंध कमी होऊन बँक पूर्वपदावर येईल, ज्या कर्जदारांचे कर्ज थकीत झालेले आहेत, त्या कर्जदारांनी आपल्याकडील थकीत कर्जाची बाकी लवकरात लवकर भरून बँकेस व आम्हास सहकार्य करावे कोरोना काळात बँकेच्या वसुलीचे प्रमाण कमी झाल्याने बँकेस सध्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे, मी स्वतः सभासदांच्या व कर्जदारांच्या घरोघरी फिरून त्यांच्याकडील कर्ज तत्पर भरणे व नवीन भांडवल वाढविण्यासाठी विनंती करून डिसेंबर 2023 अखेर बँकेचे नेटवर्थ प्लस मध्ये आणलेले आहे. आम्ही स्वतः संचालक ही कर्जदारांच्या गाठीभेटी घेणार असून बँकेस पुन्हा एकदा पुन्हा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे निर्वाचित व्हाईस चेअरमन महादेव आजिनाथ फंड यांनी आपले विचार मांडले. निवडीनंतर सर्व संचालकांचा सत्कार करमाळा अर्बन बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.
