२६ जुलैला ‘कारगील विजय दिवस’ साजरा होणार – माजी सैनिक, वीरपत्नी यांनी उपस्थित रहावे : अक्रुर शिंदे

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : भारतीय सैन्याने पराक्रम गाजवत कारगील युध्दात मिळालेला अभूतपूर्व विजय सर्व भारतीयांच्या अस्मितेला जागवणारा व अभिमानास्पद असून, आपल्या शुर सैनिकांप्रती आदर व्यक्त करुन, बलीदान दिलेल्या वीर हुतात्म्यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो, त्यासाठी ‘कारगील विजय दिवस’ हा करमाळा येथे यशकल्याणी सेवाभवन करमाळा येथे साजरा होणार तरी सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन आजी माजी सैनिक कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष अक्रुर शिंदे यांनी केले आहे.
‘कारगील विजय दिवस’ मागील वर्षी यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. गणेश भाऊ करे-पाटील यांचे सहकार्यातून साजरा करण्यात आला होता, यावर्षीही येत्या 26 जुलै रोजी 24 वा ‘कारगील विजय दिवस’ यशकल्याणी सेवाभवन येथे साजरा करण्यात येत आहे, या समारंभासाठी वीरमाता वीरपिता, वीरभगिनी, वीरपत्नी व समस्त देशप्रेमी तसेच तालुक्यातील मान्यावरांनी उपस्थित रहावे असे आवाहन आजी- माजी सैनिक संघटना करमाळा व यश कल्याणी परीवाराचेवतीने करण्यात आले आहे.


