दारू पिऊन ट्रक चालवणाऱ्या चालकावर करमाळ्यात कारवाई.. -

दारू पिऊन ट्रक चालवणाऱ्या चालकावर करमाळ्यात कारवाई..

0


करमाळा : दारूच्या नशेत ट्रक चालवत असलेल्या चालकावर करमाळा पोलिसांनी कारवाई केली असून त्याच्याविरोधात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल मयुर नागेश कदम (नेमणूक करमाळा पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या म्हणण्यानुसार, दि. 7 मे 2026 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता जामखेड चौक येथे वाहतूक नियमन सुरू असताना एक ट्रक चालक अडखळत वाहन चालवत येताना दिसला.
संशय आल्याने पोलिसांनी ट्रक (क्र. KA-56-9153) थांबवून चालकाची चौकशी केली असता त्याने आपले नाव ताजुद्दीन दौलत साब (वय 42, रा. चिमादीचीली, ता. चिचोली, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे सांगितले.
चालकाच्या तोंडातून दारूचा उग्र वास येत असल्याने पोलिसांनी पंचांसमक्ष ब्रेथ आनालायझर मशीनद्वारे तपासणी केली असता तो मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी ताजुद्दीन दौलत साब याच्याविरोधात मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!