करमाळा-अयोध्या बस रवाना – करमाळा आगाराकडून प्रवाशांच्या मागणीनुसार अयोध्या दर्शन बस सेवा सुरू
करमाळा (संदेश प्रतिनिधी) – करमाळा आगारकडून अयोध्या दर्शन यात्रा बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आसन क्षमते नुसार एकत्रित प्रवासी संख्या उपलब्ध झाल्यासनागरिकांच्या मागणीनुसार बस उपलब्ध करून दिली जाईल अशी माहिती आगार प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे . ही बस परराज्यात जाणार असल्यामुळे या बसला महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत मिळणार नाही. या बसचा सात दिवसाचा प्रवास खर्च एका व्यक्तीला 7520 रूपये एवढा आहे.
करमाळा आगारातील दर्शन यात्रेच्या योजनेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन करमाळा आगाराचे आगार प्रमुख श्री वीरेंद्र होनराव यांनी केले आहे.. तसेच या उपक्रमाचे करमाळा तालुक्यातील प्रवासी संघटना व सर्व धार्मिक सामाजिक संघटनांकडून स्वागत होत आहे.
अयोध्या दर्शन यात्रेबरोबरच महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे, अष्टविनायक दर्शन, कोकण दर्शन, भाविक भक्तांसाठी पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर , नाशिक त्रंबकेश्वर ,वनी , घृष्णेश्वर, छत्रपती संभाजी नगर, महाड ,दादर ,नाशिक नागपूर, महू ,येथे बस सेवा प्रवाशांच्या मागणीनुसार बस उपलब्ध करण्यात येईल. फक्त महाराष्ट्रातील धार्मिक पर्यटन स्थळे यांनाच महिला सन्मान योजनेअंतर्गत सवलत मिळणार आहे. ही संकल्पना करमाळा आगाराचे चालक श्री राहुल जाधव व वाहक श्री रमेश होनकळसे यांची संकल्पना आहे. +91 96377 72323, 84840 84000 तरी प्रवाशांनी वरील दिलेल्या क्रमांकावर किंवा करमाळा आरक्षण कक्ष येथे संपर्क साधावा.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या करमाळा आगारातून शुक्रवार दिनांक 29 मार्चला प्रथमच करमाळा- अयोध्या बस रवाना झाली. ही बस करमाळा येथून सायंकाळी ४ वाजता सुटेल . नागपूर समृद्धी मार्गाने जाणार असुन अयोध्या येथे मुक्काम ,वाराणसी येथे मुक्काम गंगा आरती दर्शन प्रयागराज ,त्रिवेणी संगम ,वेणीदान विधी करून उज्जैन ,महाकालेश्वर भैरवनाथ दर्शन ,ओंकारेश्वर ममलेश्वर येथे मुक्काम करून करमाळा येथे पोहोचणार आहे .
यावेळी करमाळा आगार प्रमुख वीरेंद्र होनराव, सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक श्री.भालेराव, आगार व्यवस्थापक श्री.कदम, वाहन निरीक्षक श्री.जाधव, सहाय्यक वाहन निरीक्षक श्री. मुसळे, श्री.बिनवडे,पाटिल,कोकणे,दैन साहेब अयोध्येला बस घेऊन जाणारे चालक वीर आणि काळे,होनकळसे, राहुल जाधव, प्रवीण कांबळे कुंभार ,राऊत ,खांडवी,फसले, कांबळे, तरंगे,मोहिते ,मारकड गायकवाड मेकॅनिकल स्टाफ आदी उपस्थित होते. श्री क्षीरसागर यांनी ही बस ची सजावट करून दिलेले आहे