करमाळा येथील उद्योजक ओंकार अडाणे यांना महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्कार प्रदान -

करमाळा येथील उद्योजक ओंकार अडाणे यांना महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्कार प्रदान

0

करमाळा (दि.२१) –  करमाळा येथील सोन्याचे व्यापारी व युवा उद्योजक ओंकार अडाणे यांना २०२४ चा महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार नुकताच पिंपरी-चिंचवड (पुणे) येथील नटसम्राट निळोबा फुले सभागृहात मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

तायकून ऑफ एशिया या संस्थेकडून दरवर्षी युवा उद्योजकांना महाश्रेष्ठ उद्योजक पुरसकर दिला जातो. यावर्षी करमाळा येथील प्रसिध्द सराफ ( ज्वेलर्स) व ओंकार ज्वेलर्स व ओंकार गोल्ड पॅलेसचे संतोषशेठ अडाणे यांचे चिरंजीव ओंकार अडाणे यांना युवा महाश्रेष्ठ उद्योजक पुरस्कार जाहीर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण १८ ऑगस्ट रोजी पुणे येथे सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांचे हस्ते प्रदान करण्यात आला आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील उद्योजक उपस्थित होते. ओंकार अडाणे हे पुरस्कार प्राप्त एकमेव जिल्ह्यातील युवा उद्योजक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!